कन्याशाळे नजिकचा धोकादायक विद्युत पोल बदलला ; दीपक पाटकर यांचा पाठपुरावा

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील धुरीवाडा कन्याशाळेनजिकचा जीर्ण झालेला धोकादायक विद्युत पोल भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरण मार्फत बदलण्यात आला आहे.

कन्याशाळे मागील सी – १६/१० हा विद्युत पोल जीर्ण बनला होता. हा पोल बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत होती. याबाबत दीपक पाटकर यांना माहिती देताच त्यांनी महावितरणचे शहर अभियंता श्री. भुजबळ यांच्याशी संपर्क करून त्यांना हा पोल तात्काळ बदलण्याची सूचना केली. यानंतर तात्काळ महावितरण मार्फत हा पोल बदलण्यात आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी दीपक पाटकर आणि महावितरणचे अभियंता भुजबळ यांचे आभार मानले आहेत. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, महेश मयेकर, भाई मुणगेकर, मोहन गिरकर, विश्वनाथ नाटेकर, साळसकर, संजू बिडये, देवल हडकर, वासू गावकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!