मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने ३० ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

मालवणच्या बंदर जेटीवर आयोजन ; विशेष प्रविण्यास ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बंदर जेटी मालवण येथे ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना पैठणी सोबत सोन्याची नथ, चांदीची पैंजण, चांदीचा छल्ला, मोबाईल व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्यास विशेष आकर्षण म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार (नेकलेस) जिंकण्याची संधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.

येथील आर्यन होम स्टे मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गणेश पाडगावकर, स्नेहल मेथर, ममता तळगावकर, देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, फेलीस फर्नांडिस, सल्लागार अमृता मोंडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी श्री. मोंडकर म्हणाले, सन २०१६ पासून आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत,
कोरोनाच्या कालावधी मध्ये देखील मंडळाच्या वतीने दोन वर्षे सातत्याने या सणाचं वैशिष्ट्य जपत बंदर जेटी जवळ मास्क वाटप करण्यात आले. यंदा स्पर्धेचे आठवे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यावेळी सुद्धा महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले आहे. या स्पर्धेत प्रमुख पाहूणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकांस पैठणी, सोन्याची नथ सोबत १० लाखाचा विमा देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास पैठणी व सोन्याची नथ सोबत १० लाखाचा विमा, तृतीय क्रमांकासाठी पैठणी व चांदीची पैंजण, तर चतुर्थ क्रमांकासाठी पैठणी, मोबाईल दिला जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी अथवा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपन देण्यात येतील व या कुपनमधून लकी ड्रॉ द्वारे देखील चांदीचा छल्ला हे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेला नारळ मोफत मिळतील तसेच या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या व स्पर्धा पाहणाऱ्या उपस्थित नागरिकांना कुपन दिले जाईल. यातुन एक कुपन लकी ड्रा पद्धतीने काढण्यात येईल त्या विजेत्यास आकर्षक बक्षीस चांदीचा छल्ला मिळेल. या स्पर्धेत सलग तीन वर्षे विजेता, उपविजेता, तृतीय किंवा चतुर्थ क्रमांकाने विजयी होणाऱ्या स्पर्धकांस विशेष प्राविण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता अरविंद मोंडकर ९८९२०५५८२०, गणेश पाडगावकर ९४२३२१४७४५, विद्या फर्नांडिस ७७६७०५३३६४, स्नेहल मेथर ९७०२६०४७२०, ममता तळगावकर ९४२०२६०१४१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!