अभिमानास्पद ! “चंद्रयान ३” च्या यशात राणेंच्या एमएसएमई मंत्रालयाचेही महत्वपूर्ण योगदान…
केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी इस्त्रोच्या टीमसह देशवासीयांचे केले अभिनंदन…
कुणाल मांजरेकर
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली इस्त्रो ची चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाली आहे. भारत देश चंद्रांच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असून यामुळे समस्त देश वासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. इस्त्रोच्या या महत्वाकांक्षी मोहिमेमध्ये कोकणचे सुपुत्र केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई मंत्रालयाने देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
चंद्रयान ३ च्या निर्मितीत ना. राणेंच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भुवनेश्वर टूल रूमने या मोहिमेसाठी ४३७ प्रकारच्या सुमारे ५४ हजार एयरो-स्पेस कंपोनेंटची निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे IDEMI मुंबई ने देखील कंपोनेंट निर्मिती मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली.
आजादीच्या अमृत महोत्सव कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारताने अंतरीक्ष मोहिमेत नवीन कीर्तिमान स्थापित केला असून याबद्दल आपण इस्त्रोच्या टीमसह देशवासीयांचे अभिनंदन करीत असल्याचे ट्विट ना. राणे यांनी केले आहे.