मालवणात मनसे – शिवसेना “साथ साथ” ….

मनसेच्या पदाधिकाऱ्याचे उपोषण सोडवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्याची मध्यस्थी ; मंत्री दीपक केसरकर यांचा अधिकाऱ्यांना फोन

मालवण | कुणाल मांजरेकर

स्वातंत्र्यदिनी मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे ताबडतोब भरा, साळेल-नांगरभाट येथे मयत लोकांची सही करून व अंगठा लावून चार दिवसात फेरफार मंजूर केल्याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करा, पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी करा व कारवाई करा. साळेल-नांगरभाट ग्रामपंचायतीकडून परतफेडीच्या अटीवर घेतलेले १,५३,००० रु. तात्काळ वसूल करा. या मागण्यांसाठी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष उदय गावडे यांनी मालवण तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडले. यावेळी हे उपोषण सोडवण्यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी मध्यस्थी करीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केल्यानंतर ना. केसरकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून चर्चा केल्यानंतर या उपोषणावर पडदा पडला. त्यामुळे मनसे – शिवसेना साथ साथ आल्याचे चित्र मालवणात पाहायला मिळाले.

या उपोषणस्थळी तहसीलदार सौ.वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्यासह मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर आदींनी दाखल होत उदय गावडे यांना संबंधित विषयावर चर्चा घडवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी बबन शिंदे यांनी मोबाईलवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याशी बोलणे करून दिले.मंत्री दीपक केसरकर यांनी गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या. शासनाकडून पोलीस पाटील व कोतवाल यांची भरती प्रक्रिया सुरू असून मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे लवकरच भरली जातील असे आश्वासन तहसीलदार सौ.वर्षा झालटे यांनी दिले. सॅनिटरी पॅड मशीन १५ वा वित्त आयोग कामाचा याबाबत प्राथमिक चौकशी करण्यात येईल असे सांगत गटविकास अधिकारी गुजर यांनी लेखी पत्र दिल्यानंतर उदय गावडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!