मालवणात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मालवण शहरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर भरड येथील सेंटरवर संपन्न झाले. या शिबिराचा ४६ नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराचे नियोजन गणेश पाडगावकर व सरदार ताजर यांनी तर सूत्र संचालन पल्लवी तारी – खानोलकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, जेम्स फर्नांडिस, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी – खानोलकर, महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, हर्षदा पाटील, सौ. शुभदा पाडगावकर, हर्षाली पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, दिलीप तळगावकर, केदार केळुसकर, राजू लुडबे आदि उपस्थित होते. दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० पर्यत हे शिबीर घेण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!