मालवणात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : शहरातील बसस्थानक पाठीमागील बौद्धवाडीत चंद्रसेन प्रकाश चाफेखोलकर वय-२८ मूळ रा. तोंडवळी मालवण या युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीने वाशास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. गेले वर्षभर त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती त्याचा भाऊ अमोल चाफेखोलकर याने पोलीस ठाण्यात दिली आहे.
बौद्धवाडी येथे सध्या वास्तव्यास असलेल्या चंद्रसेन चाफेखोलकर या युवकाने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे स्थानिकांना दिसून आले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. चंद्रसेन याची गेले वर्षभर मानसिक स्थिती चांगली नव्हती. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!