चौकेत भरधाव मोटरसायकलची दगडाला धडक ; सावंतवाडीतील युवकाचा जागीच मृत्यू

तर आचरा डोंगरेवाडीतील युवक गंभीर ; जखमीला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवले

नितीन गावडे

चौके : मालवण हुन भरधाव वेगाने कसालच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज रात्री पावणे अकरा वाजण्याच्या चौके बाजारपेठ येथे घडली.

मृत युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव गणेश सुरेश भोसले (रा. सावंतवाडी न्यू सबनिसवाडा) असे आहे. तर हरिश परब (रा. आचरा डोंगरेवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सरपंच राजा गावडे, संतोष गावडे, बंड्या गावडे, मंदार गावडे, गोट्या गावडे, मयुर गावडे, ऋषी पवार, प्रविण चौकेकर, गुरु चौकेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी झालेल्या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

मृत गणेश भोसले
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!