राज्य सरकारचा सावळा गोंधळ ; आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा ; आरोग्य राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रवीण दरेकर यांची नाराजी

कुणाल मांजरेकर

राज्य सरकारमधील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोग्य विभागातील मेगाभरतीसाठी शनिवारी आणि रविवारी होणारी लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री अचानक जाहीर केला आहे. यामुळे परीक्षा केंद्राकडे निघालेल्या परिक्षार्थींमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. खुद्द आरोग्य राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

या परिक्षेचे कंत्राट एका कंपनीकडे देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली.
राज्याच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून त्यासाठी उद्या आणि परवा होणार होत्या. मात्र या परिक्षेपूर्वीच अनेक गोंधळ समोर आले होते. शुक्रवारपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच उपलब्ध होत नव्हते. तर अनेक जिल्ह्यात या पदांसाठी दहा ते पंधरा लाखाची बोली लावली गेल्याची चर्चा होती. त्यातच वेगवेगळ्या जिल्ह्यात परिक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे ठेवण्यात आल्याचेही समोर आले होते. ज्या कंपनीकडे परिक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. त्या कंपनीने प्रश्नपत्रिका वितरीत करण्यासाठी आणखी एका कंपनीला पोट कंत्राट दिल्याचा प्रकारही समोर आला होता. या साऱ्या मुळे या परिक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह होते. या सर्व प्रकारामुळे या परिक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. राजेश टोपे यांनी या संदर्भात मुंबईत घोषणा केली आहे. स्थानिक अधिकारी मात्र अजूनही या संदर्भातील अधिकृत निर्णयाची वाट पहात असून जोपर्यंत कागदोपत्री आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यापूर्वीदेखील खाजगी कंपन्यांकडे परिक्षांचे कंत्राट गेल्यानंतर मोठे गोंधळ निर्माण झा
ले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!