कुडाळ आणि मालवण तालुक्यातील २३ कामांसाठी ४२ कोटींचा निधी

कोणकोणत्या रस्त्यांचा आहे समावेश ? कोण आहेत तुमच्या रस्त्याचे ठेकेदार ?

वर्क ऑर्डर दिलेल्या “त्या” २३ कामांसह ठेकेदारांची यादी आ. वैभव नाईक यांनी केली जाहीर

कुणाल मांजरेकर

कुडाळ आणि मालवण तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. त्यावर उपाय म्हणून विरोधी पक्षाकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील वर्क ऑर्डर दिलेल्या २३ कामांची यादीच पत्रकार परिषदेत सादर केली आहे. यासाठी तब्बल ४२ कोटींचा निधी खर्च होणार असून यामध्ये कुडाळ तालुक्यातील १४ तर मालवण तालुक्यातील ९ कामांचा समावेश आहे. या कामांची मंजुरीची रक्कम आणि ठेकेदारांची नावे आ. नाईक यांनी पत्रकारांना सुपूर्द केली आहेत. कोण आहेत हे ठेकेदार आणि कोणाकडे आहे, आपल्या कामांची जबाबदारी ? याचं उत्तर या निमित्ताने मिळालं आहे.

मालवण तालुक्यातील ९ कामांना १३ कोटी ७३ लाख ६५ हजार ३९७ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. यामध्ये बेळणे रस्ता दुरुस्ती – रक्कम – २ कोटी ४९ लाख ३१ हजार ३०१ रुपये – ठेकेदार – दत्ता सामंत, काळसे कट्टा मसदे मसुरे कावा रस्ता सुधारणा आणि डांबरीकरण करणे २ कोटी ४७ लाख ४६ हजार ३२३ रुपये, कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी १० लाख १९ हजार ५७३ रुपये – ठेकेदार – अनिस नाईक, सुकळवाड तळगाव बाव रस्ता विशेष दुरुस्ती ४२ लाख ९६ हजार ४७ रुपये ठेकेदार – अनिस नाईक, चौके धामापूर कुडाळ रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे ३ कोटी २४ लाख ५३ हजार २४२ रुपये ठेकेदार – एन. बी. तावडे, सुकळवाड तळगाव बाव रस्ता विशेष दुरुस्ती १ कोटी २५ लाख ४६ हजार ४४० रुपये ठेकेदार – दत्ता सामंत, ओझर कांदळगाव मोगरणे मसुरे बांदिवडे आडवली भटवाडी रस्ता दुरुस्ती १ कोटी ९६ लाख ४९ हजार ७३ रुपये ठेकेदार- आशिष परब, वायरी देवबाग रस्ता विशेष दुरुस्ती करणे १ कोटी ३५ लाख ३४ हजार ४९७ रुपये ठेकेदार – आशिष परब यांचा समावेश आहे.

कुडाळ तालुक्यातील १४ कामांसाठी २ कोटी ८२ लाख ७५ हजार ७०० रुपये मंजूर करण्यात आले असून या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये कुपवडे कडावल नारूर वाडोस शिवापूर रस्ता २ कोटी १२ लाख ५१ हजार ५०० रुपये ठेकेदार – गणेश इन्फ्रा (म्हादळकर, दिलीप नार्वेकर), कुपवडे कडावल नारूर वाडोस शिवापूर २ कोटी ८४ लाख ४६ हजार ६७७ रुपये ठेकेदार – एन. बी. तावडे (नंदू तावडे), कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोडगे रस्ता १ कोटी १ लाख ७५ हजार २६९ रुपये, कुडाळ वालावल चेंदवण कवठी रस्ता २ कोटी २० लाख ४० हजार ५२० रुपये ठेकेदार- एस. एल. ठाकूर, तेंडोली माड्याचीवाडी ते राज्य महामार्ग १८३ रस्ता १ कोटी ३० लाख ७५ हजार ४१८ रुपये ठेकेदार – गणेश इन्फ्रा (म्हादळकर, दिलीप नार्वेकर), वालावल माऊली मंदिर रावदास कुशेवाडा आंदुर्ला मुणगी केळुस व दाभोली तेंडोली माड्याचीवाडी ते राज्य महामार्ग १८२ ला मिळणारा रस्ता सुधारणा आणि डांबरीकरण करणे १ कोटी ९३ लाख ६७ हजार ४३५ रुपये ठेकेदार- एस. एल. परब, कुडाळ पावशी तुळसुली घावनळे आंबेरी माणगांव कांदुळी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे २ कोटी २८ लाख ५६ हजार ८८७ रुपये ठेकेदार – प्रभाकर परब, कुडाळ तालुक्यातील रा. महामार्ग क्र. १७ ते पिंगुळी नेरूर जकात (माणकादेवी) मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४६ रुंदीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी १० लाख २१ हजार ३१८ रुपये ठेकेदार- अवधूत नार्वेकर, बांबर्डे रेल्वे स्टेशन मार्ग प्रजिमा क्र. ४३रुंदीकरण व डांबरीकरण करणे ६६ लाख ८२ हजार ३१२ रुपये ठेकेदार – गणेश इन्फ्रा (म्हादळकर, दिलीप नार्वेकर) झाराप आकेरी रा. मा..१८६ विशेष दुरुस्ती करणे ३ कोटी ५५ लाख ७९ हजार २५२ रुपये ठेकेदार – बी. डी. पाटील , झाराप आकेरी रा. मा. १८६ विशेष दुरुस्ती करणे ३ कोटी १७ लाख ३५ हजार ४२६ रुपये ठेकेदार – गणेश इन्फ्रा (म्हादळकर, दिलीप नार्वेकर), झाराप आकेरी रा. मा. १८६ विशेष दुरुस्ती २ कोटी ६३ लाख ६७ हजार २७९ रुपये ठेकेदार – प्रभाकर परब आणि झाराप आकेरी रा. मा. १८६ विशेष दुरुस्ती १ कोटी ९९ लाख ५७ हजार ९०८ रुपये ठेकेदार- प्रभाकर परब या कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांना वर्क ऑर्डर मिळूनही कोरोनामुळे ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. मात्र आता महिन्याभरात ही कामे सुरू होतील, असे आ. वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!