दांडी येथे गुरुवार, शुक्रवारी आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

भाजपचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर यांच्यावतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकुष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने दांडी येथे सौ. अन्वेशा आचरेकर यांच्या निवासस्थानी उद्या गुरुवार दि. १० ऑगस्ट आणि शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. याठिकाणी नोंदणीसाठी सौ. अन्वेशा आचरेकर ( 9404344322) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!