मालवणात भाजयुमोची स्टंटबाजी युवासेनेने केली उघड…

निविदा निघालेल्या मच्छिमार्केटच्या शेडसाठी मागणीचा स्टंट ; युवासेनेच्या सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण यांच्या कडून पोलखोल

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील पालिकेच्या मच्छीमार्केटच्या येथील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती करण्याच्या कामाची २७ जुलै रोजी निविदा निघाली आहे. असे असतानाही भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण आणि सहकाऱ्यांनी या शेडच्या दुरुस्तीसाठी मुख्याधिकाऱ्यांना २ ऑगस्टला निवेदन देत स्टंटबाजी केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या कामाची निविदाच युवासेनेचे उपशहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर आणि उमेश चव्हाण यांनी समोर आणली आहे. भाजपा युवा मोर्चाने जनतेला फसवण्याचे धंदे बंद करावेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शहरातील मच्छी मार्केट कडील मासे कापण्याच्या शेडची दुरावस्था झाली असून मुख्याधिकाऱ्यांनी याची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि सहकाऱ्यांनी २ ऑगस्टला मुख्याधिकाऱ्यांना दिले. मात्र प्रत्यक्षात या कामासाठी २७ जुलै रोजीच पालिकेच्या वतीने १.६४ लाखाची निविदा जारी केली आहे. याबाबतची माहिती युवासेनेचे उपशहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर व उमेश चव्हाण यांनी समोर आणली आहे. हे काम मंजूर झाल्याचे माहित असताना फुकाचे श्रेय घेण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा स्टंट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!