मेढा दोनपिंपळ येथील वीज वाहिनीवरील धोकादायक झाड तोडले
शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची यशस्वी मध्यस्थी
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील मेढा येथील दोन पिंपळ नजिकचे विद्युत अखेर तोडण्यात आले आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
येथील तीठ्यावरील धोकादायक झाड बऱ्याच वर्षापासून स्थानिकांना त्रासदायक ठरत होते. या झाडाच्या वाहिन्या विद्युत लाईन मध्ये घुसलेल्या असल्याने अनेकदा परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत होता. अखेर सदरील झाड मालकाशी श्री. जावकर यांनी यशस्वी बोलणी करून हे आंब्याचे झाड नागरीकांच्या मागणीनुसार स्वतः जातीनिशी राहून तोडून घेतले. त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या वीज पुरवठा खंडितला कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे मेढा येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी मेढा भागातील शाखाप्रमुख बंड्या सरमळकर व नागरिक उपस्थित होते.