…. तर मालवण नगरपालिकेसमोर नागरिकांना घेऊन आंदोलन छेडणार

मालवण शहर शिवसेना (ठाकरे गट) यांचा पालिका मुख्याधिकाऱ्यांना इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपरिषद हद्दीतील मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. मुख्य चौक, नाका मार्गावर बसवण्यात आलेले हायमास्ट टॉवरही बंद असून १५ दिवसात या लाईट सुरु न केल्यास नागरिकांसमवेत नगरपरिषद कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण शहर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने पालिका मुख्याधिकाऱ्याना दिला आहे.

पावसाळा कालावधी असल्याने साचणारे पाणी, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, खड्डेमय मार्ग यांचा विचार करता पादचारी व सायकल चालक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आगामी काळातील सण उत्सव यांचा विचार करता बंद स्ट्रीट लाईट, हायमास्ट टॉवर लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, तपस्वी मयेकर, युवासेना पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सिद्धू जाधव, युवतीसेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3841

Leave a Reply

error: Content is protected !!