कुडाळ रेल्वेस्थानक प्रवाशी व पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल !

भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत होते त्यावेळी ज्या प्रकारे निधी आपल्या जिल्ह्यासाठी येत होता, त्याच पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कालावधीत निधी येत आहे. २०१४ नंतरचा बॅकलॉग त्यांच्या माध्यमातून भरून काढला जात आहे, असे प्रतिपादन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण भूमिपूजनावेळी केले. तसेच या सुशोभीकरणामुळे कुडाळ रेल्वे स्थानक हे प्रवाशी व पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल असे त्यांनी सांगितले.

कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करून भूमिपूजनांने झाले. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, प्रदेश सदस्या सौ संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, बाबा परब, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे प्रदेश सदस्य बंड्या सावंत, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, पप्प्या तवटे, मकरंद राणे, राकेश सावंत, निशय पालेकर, चंद्रकांत मयेकर आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे कुडाळ व मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे म्हणाले, कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी ६ कोटी एवढ्या मोठ्या रक्कमेचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे. गेल्या काही वर्षांमधील बॅकलॉग भरून काढण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण करीत आहे. हे कौतुकास्पद असून जिल्ह्यासाठी एवढा निधी आणत असल्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी या जिल्ह्यासाठी ज्या प्रकारे निधी येत होता. त्या पद्धतीने सध्या येत आहे. २०१४ नंतर या जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली होती. मात्र आता मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर झपाट्याने विकास होत आहे. कोकणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय सरकारने केलेला नाही. कोकणातही मोठ्या प्रमाणावर निधी दिली जात आहे. येत्या काळामध्ये अनेक प्रकारचा निधी या जिल्ह्यात येणार असून जिल्ह्याच्या विकासाला साथ मिळणार आहे. असे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!