धुरीवाडा येथे आज मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर
भाजपाचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी पराडकर यांच्यावतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते बंड्या पराडकर, भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा राणी पराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरातील धुरीवाडा येथे आज शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आली आहेत.
धुरीवाडा येथे बंड्या पराडकर यांच्या निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून नोंदणीसाठी तुषार वाघ 7208430076, राणी पराडकर 9834354698 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.