भाजपाचे युवा कार्यकर्त्या सौरभ श्रीकुष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराना उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरुवार, शुक्रवारी माजी नगरसेविका महानंदा खानोलकर आणि भाजपा महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर यांच्या संयुक्त आयोजनाखाली आयोजित शिबिरात तब्बल २०० जणांची नोंदणी

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मोदी @९ अंतर्गत मालवण शहरात राबवण्यात येत असलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत शहरातील विविध प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये तब्बल ७०० जणांची नोंदणी करण्यात आली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी माजी देऊळवाडा आणि आडवण येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये २०० जणांनी नोंदणी केली आहे. ही दोन्ही शिबिरे माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर आणि भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा, माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांच्या संयुक्त आयोजनाखाली दोन दिवस ही शिबिरे घेण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर आणि माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस देऊळवाडा येथील हॉटेल महाराजा मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड नोंदणी विशेष शिबीर घेण्यात आले. तर भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. करलकर यांच्या निवासस्थानी देखील हे शिबीर घेण्यात आले. या दोन्ही शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास २०० जणांनी यावेळी नोंदणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनहिताची ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवुन नाव नोंदणी केल्याबद्दल नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व सर्व आयोजकांचे विशेष आभार मानले.

यावेळी सौ. महानंदा खानोलकर, पूजा करलकर, प्रमोद करलकर, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निशय पालेकर, चंद्रकांत मयेकर, कुणाल खानोलकर, अरविंद मयेकर, चंदू मेस्त्री, उमेश मेस्त्री, सायली मराळ, विजय हिर्लेकर, विश्वास परब, सिद्धेश, मराळ, कविता वराडकर, अनंत साळगावकर, महेंद्र मराळ, निनाद बादेकर, आरोग्यमित्र दशरथ गोसावी, आरोग्यमित्र परब उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!