मणिपूर अत्याचाराच्या विरोधात उद्या मालवणात मुकमोर्चा ; शिवसेना ठाकरे गटाचा पाठींबा

शिवसेना, युवासेना, महिला, युवतीसेना व सर्व शिवसैनिक सहभागी होणार ; हरी खोबरेकर

मालवण | कुणाल मांजरेकर

मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणातील शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी शहरात मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मुकमोर्चास मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठींबा असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.

मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार कोणत्याही संवेदनशील मनाला यातना देणारे आहेत. या आणि देशात अन्यत्र घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना या निषेधार्थ आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मालवण वासीयांच्या या मोर्चास आमचा सक्रिय पाठींबा असून या मोर्चात शिवसेना युवासेना, महिला, युवतीसेना व सर्व शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती श्री. खोबरेकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!