मालवण : आडवण, देऊळवाडा येथे उद्या आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर आणि माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर यांच्यावतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर व माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर
यांच्या संयुक्त विद्यमाने आडवण आणि देऊळवाडा येथे उद्या शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आली आहेत.

देऊळवाडा येथील हॉटेल महाराजा येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले असून याठिकाणी नोंदणीसाठी सौ. महानंदा खानोलकर ( 9423806158) यांच्याशी संपर्क साधावा. तर आडवण येथील पूजा करलकर यांच्या निवासस्थानी देखील उद्या शिबीर आयोजित करण्यात आले असून याठिकाणी नोंदणीसाठी पूजा करलकर (7744972111) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!