भाजपच्या मालवण कार्यालयात शुक्रवार, शनिवारी मोफत आयुष्यमान भारत नोंदणी शिबीर
मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्यावतीने कोणार्क रेसिडन्सी येथील भाजपा कार्यलयात शुक्रवार दि. ४ ऑगस्ट आणि शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील सर्व वॉर्डातील लाभार्थी नागरिकांना याठिकाणी कार्ड बनवून दिली जाणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केले आहे.