भाजपा नेते निलेश राणेंचा पाठपुरावा ; कुडाळ, मालवण तालुक्यातील अडीच कोटींच्या कामावरील स्थगिती उठली

कुडाळ | कुणाल मांजरेकर

राज्य शासनाकडून विविध कारणांमुळे स्थगिती देण्यात आलेल्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या मागणी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन तालुक्यातील अडीच कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकास कामाना चालना मिळणार आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच अलीकडेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे विकास कामांकडे लक्ष वेधले होते. या प्रयत्नाला यश आले आहे. कुडाळ आणी मालवण तालुक्यातील विविध कामांवरील स्थगिती सार्वजनिक बांधकाम विभागाने उठवली आहे.

यामध्ये कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी वदे ओरोस प्रजिमा ३७ किमी ११/०० ते ११/६०० आणि १२/३०० ते १३/३०० मध्ये नूतनीकरण करणे, ता. कुडाळ, कुपवाडे गवळवाडी तोरवाडी प्रा.मा. २० खडीकरण व डांबरीकरण करणे ता. कुडाळ, पोखरण खालचीवाडी टबबाड़ी मार्ग प्रा.मा. ७२ खडीकरण व डांबरीकरण करणे ता. कुडाळ, भडगाव बुद्रुक रामा ९७९ ला जोडणारा डिगाळवाडी ग्रा. मा. ५७ खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ खडीकरण व डांबरीकरण करणे, खडीकरण व डांबरीकरण करणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक घाडोवाडी ते लोहारवाडी जाणारा रस्ता प्रा. मा. कसाल मतलवाडी रस्ता प्रा. मा. ९७ खडीकरण व डांबरीकरण करणे. ता. कुडाळ, पांग्रड काजीमाचे टेब मार्ग ३६ खडीकरण व डांबरीकरण करणे, घोटगे सोनवडे कळसुली लाडवाडी दुर्गनगर मार्ग प्रा. मा. ९ खडीकरण व डांबरीकरण करणे. ता. कुडाळ, प्रजिमा ३१ ते आंब्रड कणकपालवाडी मुस्लिमवाडी मार्ग प्रा. मा. ६८ खडीकरण व डांबरीकरण करणे, ता.कुडाळ, कडावल तावडेवाडी ग्रा. मा. ४६ खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ, आवळेगाव कुंभारवाडी ग्रा. मा. १३३ खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बुधवळे पेटेवाडी रस्ता प्रा. मा. ४३४, ०/०० से ३/००, आवळेगाव कुंभारवाडी ग्रा. मा. १३३ खडीकरण व डांबरीकरण करणे. ता. कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बुधवळे पटेवाडी रस्ता प्रा. मा. ४३४, ०/०० से ३/०० खडीकरण व डांबरीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक घाडोवाडी ते लोहारवाडी जाणारा रस्ता प्रा. मा.
१६०/०० ते १/२०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळस डोग्गीवाडी रस्ता ग्रा. मा. २४ किमी. ०/०० ते ४०० खडीकरण व डांबरीकरण करणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी ते साटमवाडी ते विष्णू मंदिर बार्यनकर आवार प्रा. मा. ३५ किमी. ०/०० ते ३/०० खडीकरण व डांबरीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा हिले मुणगेकर घाटी ते तुरुपवाडी ग्रा. मा. ४७ किमी,j०० ते २/५०० खडीकरण व डांबरीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर बाजार रा. मा. १८१ से तळे देऊळवादी प्रा. मा. ६६ रस्ता किमी ०/०० ते २५०० खडीकरण व डांबरीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे फोईल ग्रा. मा. ७७ किमी. ०/०० ते ७/२००, खडीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे.

सदर कामांबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, सदर कामांकरीता सक्षम प्राधिकरणाने मान्यता प्रदान केल्याची खातरजमा संबंधित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी करावी, सदर कामांना सक्षम प्राधिकरणाने मंजूरी दिली असल्याबाबत खातरजमा करतांना त्याबाबतचे प्रशासकीय मान्यता आदेश / तांत्रीक मान्यता आदेश अर्थसंकल्पीय प्रकाशने यामध्ये नमुद असलेले कामाचे नांव व त्याचा बाव आणि स्थगिती उठविण्यात आलेल्या कामाचे नांव व वाव योग्य असल्याची खातरजमा सुध्दा करण्यात यावी, सदर कार्यवाही करतांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमीतता आढळल्यास संबंधीत अधिकारी / कर्मचारी यांच्याविरूध्द तात्काळ शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंता यांची राहील, असे महाराष्ट्र शासन उपसचिव यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!