हिवाळेत गवारेडा पडला विहिरीत ; वन विभागाचे अधिकारी दाखल

पोईप | प्रसाद परब

मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहीरीत गवा रेडा पडल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गुरुवारी सकाळी या परिसरात चार कापण्यासाठी आलेल्या समिर पालव यांना हा दिसून आला. याबाबत माहिती पोलीस पाटील विरेन कदम यांनी वन अधिकारी यांना दिली आहे. गवारेड्याला विहिरीतून बाहेर काढण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. डोंगर भागात झाडे आणि वेली यांनी ही विहीर आच्छादलेली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!