मालवण मच्छिमार्केट नजिकची पत्राशेड नादुरुस्त ; तात्काळ उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चा मालवण शहरच्या वतीने शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी पालिकेचे लक्ष वेधले

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण मच्छिमार्केट येथील पत्रा शेड पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. अन्य समस्याही याठिकाणी आहेत. तरी सुरू झालेल्या मासेमारी हंगामाचा विचार करता मासे विक्री करणाऱ्या व मासे कापणाऱ्या विक्रेत्यांचा विचार करून येथे तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर यांच्यावतीने शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सौरभ ताम्हणकर, निकित वराडकर, निनाद बादेकर, निषय पालेकर, सचिन तारी, राजा मांजरेकर, शुभम लुडबे, लुईस फर्नांडिस उपस्थित होते. मासळी मार्केट येथे अन्य समस्याही व्यावसायिक व मत्स्य विक्रेत्या महिला यांना भेडसावत आहेत. त्याबाबतही पाहणी करून कार्यवाही करावी असेही निवेदनात म्हटले आहे. माजी खासदार निलेश राणे यांचेही याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!