“आयुष्यमान भारत” आरोग्य योजनेत पहिल्या टप्प्यात कणकवली- देवगड- वैभववाडीतील ४६,३९१ लाभार्थीची निवड

१३५० आजारांवर मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार ; आ. नितेश राणेंची माहिती

५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत तिन्ही तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये रजिस्ट्रेशन ; मिळणार आरोग्यकार्ड

कुणाल मांजरेकर

कणकवली : केंद्र सरकारची “आयुष्यमान भारत” ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार देणारी महत्वपूर्ण योजना आमदार नितेश राणेंच्या पाठपुराव्याने कणकवली -देवगड- वैभववाडी मतदार संघात राबवली जाणार आहे. यात ५ लाख रुपया पर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या एका महिन्यात आरोग्य कार्ड काढून ही योजना मतदार संघात सुरू केली जाणार आहे. मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थीची या योजने साठी निवड झाली आहे, त्यांचे राजिस्टेशन करून या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे शुक्रवारी झूम अँपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आयुष्यमान भारत या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल हे स्पष्ट केले. ते म्हणाले, या योजनेचा फायदा जनतेला व्हावा यासाठी कणकवली, देवगड, आणि वैभववाडी या तिन्ही पंचायत समिती मध्ये स्वतंत्र टेबल लांबून यंत्रणा कार्यरत केली जाईल. आयुष्यमान भारतचे अधिकारी आणि कर्मचारी तेथे येतील दिवसाला सुमारे १५०० पर्यंत लोकांचे थंम्ब घेऊन हे राजिस्टेशन होईल. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी गावस्तरावर काम करतील आणि ज्यांची नावे या आयुष्यमान भारत च्या योजनेत आलेली आहेत, अशा मतदार संघातील ४६ हजार ३९१ लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने राजिस्टेशन करून घेतील. त्यासाठी रेशनकार्ड किंवा आधार कार्ड चा नंबर देणे गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची कार्ड येतील ती वाटली जातील. मग वर्षभर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत होणार आहेत त्यासाठी सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर सह मुंबई, पुणे येथील रुग्णालये निवडण्यात आली आहेत. या योजनेत देशातील त्या त्या भागात निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचार घेऊ शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशी १३ रुग्णालये आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ आणि गोव्यातील ३४ रुग्णालये आहेत. तर मुंबईत मधील ५९ रुग्णालये आहेत. शासनाने निवडलेल्या या रुग्णालयात १३५० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. ही योजना दोन वर्षे राज्य सरकारने राबविली नाही. त्यामुळे राज्यात जनतेचे नुकसान झाले आहे. मात्र आता या योजनेचा जनतेला फायदा मिळेलच. उपचाराला पैसे नाहीत म्हणून कोणाचे प्राण जाणार नाहीत, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!