कुडाळ- मालवण मधील विकास कामांसाठी निलेश राणेंनी घेतली ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट

आ. नितेश राणे यांचीही उपस्थिती ; २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण तालुक्यातील २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांबाबत ना. महाजन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. गिरीष महाजन यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!