राज्य शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा ; विजेत्या मंडळाला ५ लाखांचे पारितोषिक

द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला अनुक्रमे २.५ लाख, १ लाखांचे पारितोषिक ; जिल्हास्तरीय समिती प्रत्येक जिल्ह्यातून एका मंडळाची शिफारस करणार

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सार्वजनिक गणेशात्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना संदर्भिय शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” येथे आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. १० जुलै ते ५ सप्टेंबर पुर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही निवड समिती प्रत्यक्ष उत्सव स्थळी भेट देतील तसेच मंडळांकडुन व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समिती कडुन प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. जिल्हास्तरीय निवड समिती जिल्हयातून प्रत्येकी एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्याचे नावे सर्व कागदपत्र, व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत दि. १ ऑक्टोंबर पर्यंत सादर करण्यात येतील.

राज्यातील पहील्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिकं व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. प्रथम क्रामांक ५ लाख रुपये, व्दितीय क्रमांक २ लाख ५० हजार रुपये , तृतीय क्रमांक- १ लाख रुपये अशा स्वरुपाची पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व जिल्ह्यातून प्राप्त राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी वरीलप्रमाणे ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!