मालवणात भाजपा पदाधिकाऱ्यांची तत्परता : केवळ पाहणी, फोटोसेशन नाही, स्वतःच्या खिशातून तात्काळ मदत !!!

वायरी हिंदळेकरवाडा येथील नुकसानग्रस्त चंद्रप्रभा हिंदळेकर यांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्व-खर्चातून ताडपत्री प्रदान

अरुण आडेलकर यांना उद्या चिरे व सिमेंट पोती देणार : दीपक पाटकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण शहरातील वायरी हिंदळेकरवाडा येथील श्रीमती चंद्रप्रभा हिंदळेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर कोसळून नुकसाम झाले आहे. याची माहिती मिळताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासनाकडून येणाऱ्या मदतीची वाट न पाहता या कुटुंबाची तातडीची गरज म्हणून जवळपास ५० × ३० फुट लांबीची ताडपत्री स्वतःच्या खिशातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री. हिंदळेकर यांच्याकडे सुपूर्द करून तात्काळ ती छप्परावर घालून दिली. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि मोहन वराडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, येथीलच अरुण तुळाजी आडेलकर यांच्या घराचेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांना १०० चिरे आणि १० सिमेंटची पोती उद्या (मंगळवारी) स्वखर्चाने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

वायरी हिंदळेकरवाडा येथील दोन घरांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच भाजपचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, मोहन वराडकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शुभम लुडबे, रोहन आचरेकर, चंद्रकांत मयेकर आदींनी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोहन चव्हाण, प्रवीण मिठबावकर, सिल्व्हिस्टर फर्नांडिस, अरुण आडेलकर, गणेश पेडणेकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र या कुटुंबाची तातडीची गरज म्हणून माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि मोहन वराडकर यांनी पुढाकार घेत जवळपास ५० × ३० फुट लांबीची ताडपत्री उपलब्ध करून दिली. ही ताडपत्री प्रभात प्रभाकर हिंदळेकर यांच्याकडे सुपूर्द करून त्यानंतर त्यांच्या घरावर घालून देण्यात आली. या बद्दल स्थानिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अरुण आडेलकर यांना चिरे, सिमेंट देणार : दीपक पाटकर

दरम्यान, येथीलच अरुण आडेलकर यांच्या घराचेही अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. येथेही भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री. आडेलकर यांना स्वखर्चातून उद्या १०० चिरे आणि १० पोती सिमेंट देण्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून मदत : सुदेश आचरेकर, दीपक पाटकर

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे हे स्वतः कुडाळ, मालवण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून ही मदत करीत आहोत, असे सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील हे भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार आहे. त्यामुळे अधिकारी योग्य ती पंचयादी करणारच. त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून संबंधिताना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे सुदेश आचरेकर, दीपक पाटकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!