चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त गटाराचे काम मार्गी
माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. दर्शना कासवकर यांचा पाठपुरावा
आ. वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे यतीन खोत यांनी मानले आभार
मालवण : शहरातील चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त करण्याच्या कामाला चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार माजी बांधकाम सभापती यतीन खोत व माजी जेष्ठ नगरसेविका दर्शना कासवकर यांच्या पाठपुराव्यातून नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. याबाबत नागरिकांनी खोत, कासवकर यांच्यासह पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे व बांधकाम प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागत असल्याचे माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सांगून आभार मानले आहेत
यावेळी भाई कासवकर, मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र युवतीसेना प्रमुख सौ. शिल्पा खोत, जॉन्सन रॉड्रिक्स, सौ. मयेकर, जॉन रुईल रॉड्रिंक्स, आंतोन फर्नांडिस, सौ प्रमिला मयेकर, अश्विनी आचरेकर, स्वाती तांडेल, दीपा पवार, तनवी भगत, ज्योती तोडणकर, मानसी घाडीगावकर, दिक्षा जाधव, भाग्यश्री फोंडबा, साक्षी मयेकर, शुभम, अमन गोडावले, तेजस पोल, राहुल जाधव यासह अन्य नागरिक उपस्थित होते.