रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड

सचिव पदी संदेश पवार तर खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड ; नूतन संचालक मंडळाचा १६ जुलै रोजी पदग्रहण सोहळा

यंदा रोटरी क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष, वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम साजरे करणार : नूतन पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

रोटरी क्लब यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून २०२३ -२४ या रौप्य महोत्सवी वर्षासाठी रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी संदेश पवार आणि खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड झाली आहे. नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. यंदा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लबच्या वतीने येथील हॉटेल स्वामी मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्ष अभय कदम, नूतन सचिव संदेश पवार, नूतन खजिनदार श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी, विठ्ठल साळगावकर, ऋषिकेश पेणकर, डॉ. अजित लिमये, डॉ. सौ. लीना लिमये, उमेश सांगोडकर, संजय गावडे, रंजन तांबे, अमरजित वणकुद्रे, रमाकांत वाक्कर आदी उपस्थित होते.

नूतन कार्यकारणी सन २०२३ – २४

अध्यक्ष – अभय कदम
उपाध्यक्ष – विठ्ठल साळगांवकर
सचिव – संदेश पवार
सहसचिव- ऋषीकेश पेणकर
खजिनदार – श्रीकृष्ण तारी
माजी अध्यक्ष – रतन पांगे
क्लब सर्व्हिस – डॉ. लिना लिमये
कम्यूनिटी सर्व्हिस – उमेश सांगोडकर
व्होकेशनल सर्व्हिस – महादेव पाटकर
इंटरनॅशनल सर्व्हिस – प्रदीप जोशी
युथ सर्व्हिस – तनिष्का कासवकर
रोटरी फाऊंडेशन – डॉ. अजित लिमये
मेंबरशिप डेव्हलपमेंट – अनिल देसाई
क्लब अॅडमिन – प्रसन्नकुमार मयेकर
क्लब बुलेटीन – सुविधा तिनईकर
सार्जंट अॅट आर्म्स – रंजन तांबे
स्पोर्टस चेअरमन – पंकज पेडणेकर
क्लब ट्रेनर – सुहास ओरसकर
लिटरसी प्रमोशन – उज्ज्वला सामंत
डायरेक्टर पोलिओ प्लस – डॉ. अच्युत सोमवंशी
क्लब फेलोशिप – अमरजीत वनकुद्रे

नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथेे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट डीजीई शरद पै यांच्यासह रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन देशपांडे उपस्थित राहणार आहेत. यंदा रोटरी क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने शालेय व कॉलेज युवतींसाठी शारीरिक स्वच्छता व आरोग्य मोहीम, दरवर्षीप्रमाणे पोलिओ हटाव मोहीम, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती व बॉटल क्रशर बसवणे, कापडी पिशव्यांचा वापर यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. नशापान करून वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे नशापान करून वाहन चालवू नये यासाठी तरुण पिढीमध्ये गांभीर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने यावर्षी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्धांसाठी संगणक प्रशिक्षण दिले जाणार असून शाळांमधून मुला-मुलींसाठी वॉश इन स्कूल या कार्यक्रमांतर्गत स्वच्छतागृहे तसेच हात धुण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी मच्छीमारांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कॅन्सर विषयी जनजागृती आणि कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. रोटरी क्लबच्या वतीने वापरलेल्या कपड्यांचा गरिबांना उपयोग होण्यासाठी क्लॉथ बँक उपक्रम राबविला जातो. याचप्रमाणे वापरलेली खेळणी गरीब मुलांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “टॉय बँक” ची देखील यंदा निर्मिती केली जाणार आहे. वृक्षारोपण व रक्तदान शिबिर, रोजगार मेळावा, स्तनपान जागृती, हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट, कचऱ्याचे निर्मूलन, पादचारी सुरक्षा जनजागृती असे उपक्रम यावर्षी रोटरी क्लब राबविणार आहे.

१६ जुलै रोजी पाच जणांचा विशेष सत्कार ; अन्य विविध कार्यक्रम

रोटरी क्लबच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा दरवर्षी सत्कार केला जातो. या वर्षी मालवण तालुक्यातील पाच जणांचा उल्लेखनीय कामासाठी सत्कार केला जाणार आहे. यामध्ये गणेश तांडेल, सदानंद टाक्कर, जेरॉन फर्नांडिस, दीपक भोगटे, प्रताप बागवे यांचा समावेश आहे. याशिवाय मालवण तालुक्यातील विविध शाळामधील १६ गरीब मुलांना सायकल वाटप, २ गरीब महिलांना शिलाई मशीन वाटप, कोळंब प्राथमिक शाळेला त्यांच्या मागणी नुसार दोन सिलिंग फॅन, स. का. पाटील महाविद्यालयाच्या एका होतकरू मुलीला शैक्षणिक मदत, २०२२- २३ मधील डिस्ट्रिक्ट ग्रँड प्रोजेक्ट अंतर्गत काळसे हायस्कुल ला टीव्ही संच आणि एज्युकेशन सॉफ्टवेअर १६ रोजीच्या कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहे.

.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!