“बेडूक उड्या बंद करा…” ; मनसेच्या सह्यांच्या उपक्रमातून नागरिकांचा संताप
“एक सही संतापाची” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; भरड नाक्यावर मनसेची जोरदार घोषणाबाजी…
मालवण : राज्यातील राजकीय घडामोडीं विरोधात नागरिकांच्या मनातील उद्रेकाला वाट मोकळी करून देण्यासाठी सोमवारी मालवणच्या भरड नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “एक सही संतापाची” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रतीक कुबल व तालुकाध्यक्ष संदीप लाड यांच्या नेतृत्वात यावेळी फलक उभारण्यात आला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप मनसे गीत वाजवत भरड नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्यावतीने राज्यभरात फलक उभारून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मालवणातील भरड नाका येथे हा फलक उभारण्यात आला होता. यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिग्ज, रामनाथ पराडकर, गणेश वाईरकर, विशाल ओटवणेकर, मिताली बांबर्डेकर, सुरज मांजरेकर, कुणाल चोडणेकर, हर्षद परब, तुषार जुवेकर, तेजस खराडे, नितीन राठोड, साईश किर, राज शेलटकर, तथागत मालवणकर, कुणाल माळवदे, प्रसाद बापर्डेकर, लौकिक अंधारी, चिन्मय कुवळेकर, वैभव आजगावकर, दर्शन सावजी, योगेश हडकर, राहुल मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी ‘बेडूक उड्या बंद करा’ असे खोचक सल्ले नागरिकांनी राजकीय नेत्यांना मनसेच्या एकही संतापाचे या मोहिमेतून दिले. राज्यातील राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक होत आहे. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी संतापाची ही मोहीम राज्यभर राबवली आहे. मनसेच्या या मोहिमेत मोठ्या फलकावर सही करून आपले मत महाविद्यालयीन तरुण, तरुणी ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या विरोधात उत्स्फूर्तपणे संताप व्यक्त केला. राजकारणाचा चिखल झाला आहे का ? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का ? चीड येत नाही का ? माझ्या मताला काही किंमत नाही का ? असे विविध प्रश्न विचारात मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना सही करण्याचे आवाहन केले होते.