केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव सांद्रेवाडी शाळेकरिता ५ लाखांचा निधी
भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस, गावभेट दौऱ्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक, सांद्रेवाडी शाळेकरीता ५ लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक या शाळेच्या वर्गखोली बांधकाम करीता निधी मिळावा यासाही भाजपा नेते निलेश राणे यांनी शिफारस केली होती. निलेश राणे विकास कामांच्या भूमिपूजन करीता भडगाव बुद्रुक येथे आले असता स्थानिक ग्रामस्थांनी शाळा बांधकाम करीता निधी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी नारायण राणे यांच्या खासदार निधीतून आपण निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निलेश राणे यांनी दिले होते. शिशुविकास विद्यामंदिर ही खाजगी प्राथमिक शाळा असून अश्या स्वरूपाच्या केवळ तीन शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. त्यापैकी भडगाव शाळेची इमारत अतिशय जीर्ण झाली होती. नारायणराव राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व भडगाव बुद्रुक ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.