हवाई वाहतूक मंत्र्यांनी केलं ट्विट ; चिपी विमानतळाबाबत केली महत्त्वाची घोषणा
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्गातील विमानतळाचे उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबर रोजी होऊ घातलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे या विमान सेवेमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग चा प्रवास केवळ सव्वा तासात होणार असून हे विमानतळ केंद्राच्या उडान योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ना सिंधिया यांनी दिली आहे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे प्रत्येक सिंधुदुर्ग वासियांचे स्वप्न आहे या विमानतळामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार असून गेली काही वर्षे रखडलेले हे विमानतळ पूर्णत्वास जात आहे येत्या 9 ऑक्टोबर रोजी विमानतळाचे अधिकृत उद्घाटन होत असून या उद्घाटनाला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्री यांनी ट्विट करून याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे
“सिंधुदुर्ग के लिए एक बड़ी सौगात! ९ अक्टूबर को सिंधुदुर्ग हवाईअड्डे के लोकार्पण के साथ-साथ UDAN परियोजना के तहत मुम्बई और सिंधुदुर्ग के बीच @allianceair की प्रतिदिन विमान सेवा की शुरआत भी होने जा रही है। इस सेवा के संचालन से मुंबई और सिंधुदुर्ग के बीच की दूरी केवल 1.25 घंटे में पूरी होगी। यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के प्रेरक नेतृत्व में हम देश के हर नागरिक तक विमान सेवा पहुँचाने के लिए दृढ़ संकल्पित हैं। ” असं या ट्विट मध्ये म्हटलं आहे.