अन् बागायत पुलानजीक साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या “धडाकेबाज” कार्यशैलीचा पुन्हा प्रत्यय ; माळगांव ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचा प्रत्यय माळगाव – बागायत ग्रामस्थांना आला आहे. मोदी @ 9 अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांच्या भेटीँगाठी घेण्यासाठी नुकताच निलेश राणे यांनी माळगांवचा दौरा केला होता. यावेळी येथील ग्रामस्थांनी बागायत पुलानजीक साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मांडून यामुळे येथील ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसत असल्याची कैफियत मांडली होती. ही समस्या ऐकताच निलेश राणे यांनी त्याच ठिकाणहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित पाटील यांना संपर्क करीत आजच्या आज ह्या विषयावर तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानुसार त्याच संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने येथे गटार खोदाई करीत हा प्रश्न निकाली काढला आहे. या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच निलेश खोत यांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

दोन दिवसांपूर्वी भाजपा नेते निलेश राणे माळगाव च्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ग्रामस्थांनी बागायत पुला नजिक साचणाऱ्या पाण्याकडे लक्ष वेधले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!