लायन्स क्लब, मालवणच्या अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड
सचिवपदी उमेश शिरोडकर तर खजिनदारपदी सचिन शारबिद्रे ; नूतन संचालक मंडळाचा ९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा
मालवण | कुणाल मांजरेकर
लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी उमेश शिरोडकर तर खजिनदारपदी सचिन शारबिद्रे यांची निवड झाली आहे. नूतन अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिजनल चेअरमन एमजेएफ राजेंद्र शहा कांसवा यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
लायन्स क्लब मालवणचे नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :- अध्यक्ष- विश्वास गावकर, माजी अध्यक्षा वैशाली शंकरदास, सचिव- उमेश शिरोडकर, खजिनदार – सचिन शारबिद्रे, प्रथम उपाध्यक्ष- अनुष्का चव्हाण, द्वितीय उपाध्यक्षा अंजली आचरेकर, तृतीय उपाध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सहसचिव- स्नेहा जामसंडेकर, सहखजिनदार – मीना घुर्ये, टेल ट्रिस्टर पल्लवी खानोलकर, टेमर- स्वप्नाली नेरुरकर, स्वच्छ भारत-श्वेता यादव, लायन क्रेस्ट- जयश्री हडकर, मेंबरशिप चेअरमन- राधिका मोंडकर, पीआरओ-दिक्षा गावकर, जीएसटी चेअरमन राजा शंकरदास. तरी या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मावळत्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, खजिनदार अंजली आचरेकर, सचिव अनुष्का चव्हाण यांनी केले आहे.