मालवणात नूतन पोलीस निरीक्षकांचा पहिला दणका ; गोवा बनावटीच्या दारुवर छापा
महिलेवर गुन्हा दाखल ; वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे कारवाई
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण कोल्हे यांनी पहिला दणका दिला आहे. वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथे रविवारी सायंकाळी गोवा बनावटीच्या दारुविक्री वर छापा टाकून एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा सौरभ खुरंदळे ( रा. वायरी भूतनाथ वराडकरवाडी) असे या संशयीत महिला आरोपीचे नाव आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
येथील गोवा बनावटीच्या दारू विक्रीची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, होमगार्ड जॉयल फर्नांडीस, माधवी मालवणकर, चालक भगवान खोत यांच्यासह येथे छापा टाकून घराच्या समोरील गडग्याच्या बाजूला गोवा बनावटीची दारू विक्री करताना हर्षदा खुरंदळे या महिलेला रंगेहाथ पकडले. तिच्या कडून ७१०० रुपयांची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत उपनिरीक्षक शिवराज झांझुरणे यांनी खबर दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. डी. व्ही. जानकर करीत आहेत.