एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ
मालवण : तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जुलै २०२३ पर्यत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया नोंदणीसाठी वाढ देण्यात आली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी https://poly23.dtemahara shtra.gov.in/diploma23/या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. प्रथम वर्ष डिप्लोमासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ जुलै पर्यंत वाढवली असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणेकरिता E-Scrutiny / Physical Scrutiny असे दोन पर्याय आहेत. विद्यार्थ्यांना घरातून, संगणक,मोबाईलवर तसेच सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरता येतील. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ११ जुलै व १२/ जुलै २०२३ ला प्रसिद्ध करण्यात येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी १४ जुलैला जाहीर होईल. अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदविका प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश अर्ज भरून निश्चित करण्यासाठी नजीकच्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.