सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या ४० वा वर्धापन दिन

सकाळी १०.३० वा. शरद कृषी भवनमध्ये विशेष कार्यक्रम ; आ. प्रवीण दरेकर, आ. जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापन दिन उद्या १ जुलै रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी १०.३० वा. शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई जिल्हा म. सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा म. सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, ठाणे जिल्हा म. सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा आपुलकीच्या सेवेसह लाखो ग्राहकांना देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक दिवस स्पर्धेचा असूनही शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेतीपुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आज महाराष्ट्रात अव्वलस्थानी आहे. ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४१ वर्षात पदार्पण करत आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सदर सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँकेच्या सर्व संचालक मंडळाने केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!