पोईपमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात
पोईप : पोईप येथील वेलांकणी चॅपेलमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी नऊ दिवस नोवेना केली. यात सर्व समाजातील तसेच वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली गेली.
या सणासाठी प्रमुख मसुरे पॅरीसच्या फादर गिलबट, चिंदर गावचे फादर सॅबी, माणगावचे फादर विल्यम वरळीकर आणि फादर फ्रँकलीन यांनी उपस्थित राहून येथील उपस्थित ख्रिस्ती बांधवांना धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी मसुरे चर्चच्या सिस्टर यांनी वेलांकणी मातेची मुर्ती घेऊन सर्व खिस्ती बाधवांच्या उपस्थितीत पोईप बाजार पेठ येथे शांतता फेरी काढण्यात आली. या सणासाठी मसुरे, कसाल, चिंदर, वेरली, कट्टा या गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते. पोईप गावातील तरुण मंडळीनी पुढाकार घेऊन पार पडला. तसेच खिस्ती बाधवांचे व इतरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोईप गावाचे रहिवासी निकोलस लोबो यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.