दत्ता सामंतांची वचनपूर्ती !  गणेश विसर्जन घाट व संरक्षक भिंतीचे स्वखर्चाने नूतनीकरण

वायंगणी पाटवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीची दखल ; ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वायंगणी पाटवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपचे प्रांतिक सदस्य तथा प्रतिथयश उद्योजक दत्ता सामंत यांनी येथील गणेश विसर्जन घाट आणि संरक्षक भिंतीचे स्वखर्चाने नूतनीकरण करून दिले आहे. दत्ता सामंत यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या मार्फत दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

दत्ता सामंत यांनी काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जनावेळी होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा घाट नवीन बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने हे काम करून दिले आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी मुंबई मंडळ अध्यक्ष विलास चव्हाण, सरपंच विलास पाटकर, डॉ. कोळंबकर, चंदू सावंत, विजय सावंत, महेश सावंत, महादेव सावंत, संजय सावंत, सदानंद सावंत, प्रतिक सावंत, रोहन सावंत, गणेश सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3525

Leave a Reply

error: Content is protected !!