भाजपा नेते निलेश राणे यांचा मालवणात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी संवाद ; कार्यकर्त्यात उत्साह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना आणि विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी @९ अभियाना अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी मालवण शहर आणि तालुक्यात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. पक्ष संघटनेत आपण ज्या तत्परतेने काम करता त्याचप्रमाणे मोदी @९ अभियानातही सर्वांनी काम करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्ष कार्यकाळातील विविध योजना व विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून संपर्क अभियान यशस्वीपणे राबवूया, असे आवाहन निलेश राणे यांनी केले. निलेश राणे यांनी भर पावसात दिवसभर तालुका दौरा केला. या दौऱ्यामुळे सर्व कार्यकर्त्यांत मोठा उत्साह निर्माण झाला होता.
या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. बुधवारी कुडाळ तालुक्यात शक्ती केंद्र प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर गुरुवारी मालवण तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ शहरातून करण्यात आला. शहरात मेढा येथील माजी नगरसेवक शक्ती केंद्र प्रमुख गणेश कुशे यांच्या निवासस्थानापासून दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच ९ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, प्रभारी संजू परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मालवण तालुका अभियान प्रमुख आप्पा लुडबे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, पूजा करलकर, आबा हडकर, बबलू राऊत, राजू परुळेकर, संजय लुडबे, संजीवनी लुडबे, सुहास हडकर, महेश सारंग, दादा नाईक व अन्य उपस्थित होते.
शहरातील गणेश कुशे, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, या शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन या अभियानाची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागात वायरी येथे मंदार लुडबे, देवबाग राम चोपडेकर, कुंभारमाठ अशोक चव्हाण, देवली विरेश मांजरेकर, पेंडूर आतिक शेख, वराड राजन माणगावकर, कट्टा महेश वाईरकर या शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांनी माहिती दिली. यावेळी हरेश गावकर, मुन्ना झाड, भाई मांजरेकर, विक्रांत नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, नारायण लुडबे, विजय चव्हाण, नंदू देसाई, संदेश तळगावकर, रामचंद्र करलकर, विशाखा पाटकर, सुहासिनी करलकर, रत्तनप्रभा पाटकर, बूथ अध्यक्ष निलेश लुडबे, खुशबू करलकर, दिप करलकर, संजय नाईक, सुमित सावंत, अमित सावंत, सुरेश चौकेकर, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.