मोदी @९ अभियानाअंतर्गत निलेश राणेंकडून शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ
कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी, भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपा नेते निलेश राणे कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार आहेत.
मोदी @९ अभियान अंतर्गत कुडाळ, मालवण मतदार संघात शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून घरो घरी संपर्क अभियान विधानसभा मतदारसंघात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रभारी असलेले निलेश राणे कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन भेट देत असून या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेतला जात आहे. बुधवारी कुडाळ तालुक्यातील बाव शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब यांच्या निवासस्थानापासून या दौऱ्याला सुरुवात झाली असून त्या नंतर पावशी, कसाल, ओरोस, हुमरमळा, आवळेगाव, हिर्लोक, वाडोस, माणगाव, आकेरी, साळगाव येथील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देत कुडाळ तालुक्यातील संपर्क दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. या दौऱ्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी सभापती मोहन सावंत, माजी सभापती राजन जाधव, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, दीपक नारकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, राजा धुरी, नागेश परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.