कुडाळ आणि मालवण तालुक्यातील मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करा !

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांचे दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण आणि कुडाळ तालुक्यातील सर्व मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झालटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे. अश्या परिस्थितीत आपल्या कुडाळ व मालवण तालुक्यातही ही प्रक्रिया राबविण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना निलेश राणे यांनी दोन्ही तहसीलदारांना दिल्या आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!