नॉव्हेल्टी दुकानातील परप्रांतीय कामगाराकडून युवतीची छेड ; युवकांकडून “मनसे स्टाईल”ने समज ; व्हिडीओ व्हायरल

मालवण मधील घटना ; यापुढे असे प्रकार घडल्यास एकाही परप्रांतीयाचे दुकान शिल्लक ठेवणार नाही ; मनविसेच्या प्रतिक कुबल यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण बाजारपेठेतील एका नॉव्हेल्टी दुकानातील परप्रांतीय कामगाराने एका युवतीची छेड काढल्याची तक्रार मनसेच्या मालवण मधील “राजगड” मुख्य कार्यालयात दाखल झाली. यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी हे दुकान गाठून सदरील कामगाराला मनसे स्टाईल समज दिली. दरम्यान, आता फक्त समज देऊन सोडत आहोत. यापुढे असे प्रकार घडल्यास एकाही राजस्थानीचे दुकान शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांनी दिला आहे.

याबाबत मनसे कडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात एक फोन आला की बाजारपेठेतील एका दुकानातील कामगाराने एका विद्यार्थिनीशी गैरवर्तणुक केली. चुकीच्या पद्धतीने हाताला स्पर्श केला. ही तक्रार प्राप्त झाल्यावर सर्व महाराष्ट्र सैनिक त्या दुकानाच्या ठिकाणी पोहचलो असता त्याठिकाणी अजून एका व्यक्तीने हा प्रकार आधी एकदा झाला असल्याची कल्पना दिली. त्यानंतर आम्ही दुकानाबाहेर राहून त्या व्यक्तीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याचे वागणे चुकीचे वाटले म्हणून आम्ही दुकानात जात त्या व्यक्तीला मनसे पॅटर्न मध्ये समज दिली. घडला प्रकार मालकाच्या कानावर घातला. मालक बाहेर गावी असल्याने आम्ही त्याला त्याच्या बरोबरील मोठ्या व्यक्तीला दुकानात पाठविण्यास सांगितले. तरी बराच वेळ वाट पाहिली असता कोणीही आले नाही. मग आम्ही त्याला बाहेर घेत घडल्या प्रकाराबद्दल माफी मागून घेतळी व उठाबशा काढण्यास सांगितले.

मनसेचे नागरिकांना आवाहन

मालवण मध्ये असे प्रकार घडत असल्यास नागरिकांनी सर्वप्रथम पोलिसांना कळवावे किंवा मनसे मालवणच्या मध्यवर्ती कार्यालयात यावे किंवा पदाधिकाऱ्यांना कळवावे. ह्या परप्रांतीयांची मक्तेदारी मोडली गेली नाही तर हे आपल्या उरावर बसतील. यावेळी आम्ही फक्त समज दिली. पुढच्या वेळी फटकावण्यात येईल, ह्याची सर्व परप्रांतीयांनी नोंद घ्यावी. आमच्या आया बहिणीवर वाईट नजर टाकणाऱ्यांना माफी नाहीच, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!