पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

विद्यार्थ्यांनी नजिकच्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा ; एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

तंत्रशिक्षण संचनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० जून २०२३ पर्यत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया नोंदणीसाठी वाढ देण्यात आली आहे.

तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी https://poly23.dtemahara shtra.gov.in/diploma23/या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. प्रथम वर्ष डिप्लोमासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली असुन थेट द्वितीय वर्ष डिप्लोमासाठी अंतिम मुदत ३ जुलै आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणेकरिता E-Scrutiny व Physical Scrutiny असे दोन पर्याय आहेत. विद्यार्थ्यांना घरातून, संगणक, मोबाईलवर तसेच सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरता येतील. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलै २०२३ ला प्रसिद्ध करण्यात येईल व त्या यादीतील आक्षेप ४ जुलै ते ५ जुलैपर्यंत सादर करण्यात यावेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलैला जाहीर होईल. अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदविका प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश अर्ज भरून निश्चित करण्यासाठी नजीकच्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!