वायरी येथील फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा प्रथम
प्रज्ञा नागवेकर, तेजल चव्हाण अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी
सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा तसेच बॅंक ऑफ इंडिया व आरसेटी यांच्यावतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा यांच्यावतीने वायरी येथे बॅंक ऑफ इंडिया व आरसेटी यांच्याकडून घेण्यात आलेल्या फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रज्ञा नागवेकर आणि तेजल चव्हाण यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
१४ ते २३ जून पर्यंत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन नाबार्डचे अधिकारी श्री. थुटे व आरसिटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलाना केक, बर्गर, पिझ्झा, मस्कापाव, सँडविच असे पदार्थ शिकवण्यात आले. २३ जून रोजी स्टार आरसेटी यांच्या ट्रेनिंग सेंटर येथे सर्व प्रशिक्षणार्थी यांची परिक्षा घेण्यात आली. निकालानंतर प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून LDM श्री. मिश्रा तसेच स्टार आरसेटीचे श्री. परब, श्री. नाईक, सावंत मॅडम, श्री. कासले व सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा मालवणच्या व्यवस्थापक गीता चौकेकर, उपजिल्हा सल्लागार आशिष मडवळ, सहयोगिनी स्मिता लंगोटे उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक अधिकारी काळेसाहेब यांच्या प्रेरणेने महिला उद्योजक यांना उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण हे प्रथम दिले पाहिजे हे नेहमी आम्हाला सांगितले जाते. याच प्रेरणेने आजचे फास्ट फूड प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे, असे सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टाच्या व्यवस्थापक गीता चौकेकर यांनी सांगितले. तर LDM श्री. मिश्रा यांनी उद्योगासाठी लागणारे भागभांडवल याविषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. नाईक सर यांनी मार्गदर्शन केले. श्री. कासले यांनी आभार मानले.