सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या मोफत आयुष्यमान कार्ड विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तब्बल १५० जणांकडून नोंदणी ; ७५ हून अधिक नागरिकांना तत्काळ कार्डचे वितरण
नागरिकांचा प्रतिसाद पाहून मंगळवारी २० जुन रोजी पुन्हा शिबिराचे आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने मोदी@9 अभियाना अंतर्गत सोमवार पेठ येथील ताम्हणकर फिश सेंटरच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत ‘आयुष्मान कार्ड’ विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १५०/ जणांनी यावेळी स्वतःची नोंदणी केली. तर ७५ जणांना तात्काळ कार्डचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे कौतुक केले. दरम्यान, नागरिकांचा प्रतिसाद पाहून मंगळवारी २० जुन रोजी पुन्हा एकदा हे शिबीर घेण्यात येणार असल्याचे श्री. ताम्हणकर यांनी जाहीर केले आहे.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. ५ लक्ष वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. १.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी – रु. २.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण) प्रति कुटुंब, प्रति वर्ष देण्यात येते. हे आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून मालवण मध्ये विशेष शिबीर घेण्यात आले. यासाठी जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुरुले, जिल्हाप्रमुख मिलिंद आरोस्कर, पर्यवेक्षक प्रवीण तेली, आरोग्य मित्र गौरव गावंडे, प्रतीक्षा तळवडेकर यांनी सहकार्य केले. या शिबिरात ६१ जणांची नोंदणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, निशय पालेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, केतन कोचरेकर, रुपेश कांबळी, अमोल ताम्हणकर, सुनील ताम्हणकर, मिलन ताम्हणकर आदींनी परिश्रम घेतले.