मोदी@9 अंतर्गत मालवणात उद्या व्यापारी संमेलन !
कर्नाटकचे माजी आमदार निर्मल कुमार सुराना यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मोदी@ 9 अभियान अंतर्गत भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील हॉटेल चिवला बीच येथे रविवारी १८ जुन रोजी सायंकाळी ४.३० वाजता व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या व्यापारी संमेलनाला कर्नाटकचे माजी आमदार निर्मल कुमार सुराना यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोदी @9 अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत मालवणात उद्या व्यापारी संमेलन होणार आहे. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा संयोजक प्रमोद जठार, प्रदेश कार्यकारणी सदस्य दता सामंत, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांमध्ये केलेल्या कामाची माहिती देऊन हे मान्यवर व्यापारी बांधवांची संवाद साधणार आहेत. तरी व्यापारी बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर आणि तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.