मसुरे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू ; भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
मालवण : जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम इंधनासाठी असलेला निधी संपल्याने बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मसुरे गावातील स्थानिकांनी हे काम समाधानकारक नसून पुन्हा गाळ उपसा सुरू करण्याची मागणी भाजपा नेते, माजी खा. निलेश राणें कडे केली होती. त्यावर निलेश राणे यांनी मसुरे येथे जाऊन प्रत्यक्ष पहाणी करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नंतर जलसंधारण विभागाशी पत्रव्यवहार करत निलेश राणे यांनी तातडीच्या निधी उपलब्धतेची मागणी केली होती त्यावर केवळ चार दिवसात आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू झाला असून मसुरे ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.