कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ देवस्थानांच्या परिसराचे होणार सुशोभिकरण…

भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रयत्न ; प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन सचिवांचे आदेश

दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ मंदिरांच्या परिसराचा होणार कायापालट

कुडाळ : कुडाळ शहराचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ गावातील प्रमुख मंदिरांच्या परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. याबाबत माजी खा. निलेश राणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी केलेल्या पाठपुराव्या नंतर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पर्यटन सचिवांनी दिले आहेत.

धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसराच्या विकासासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करत या देवस्थान परिसराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रादेशिक पर्यटन संचलनालयाच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसराचा विकास आराखडा बनवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक पर्यटन संचलनालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लवकरच अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा विकास होणार आहे. यात श्री देव कुडाळेश्वर मंदिर कुडाळ, श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस बुद्रुक, श्री सिद्ध महादेव मंदिर केरवडे कर्याड नारूर, श्री लिंग रवळनाथ मंदिर पोखरण, देवी भगवती मंदिर आंब्रड, श्री देव गिरोबा मंदिर भडगाव, श्री देवी भराडी मंदिर वाडीवरवडे, श्री देवी भावई मंदिर गोठोस, श्री देव जटाशंकर मंदिर नेरूर, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल, श्री देव स्वयंभू महादेव मंदिर पांग्रड, श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर इत्यादी देवस्थान परिसरांचा विकास पहिल्या टप्यात होणार आहे. तर पुढील टप्प्यात उर्वरित मंदिरांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!