अणाव हुमरमळा येथील “त्या” मुलाचे पालक “१०० इडिएट”च्या भेटीला ; लाखामोलाच्या मदतीबद्दल मानले आभार
मालवण : अणाव हुमरमाळा येथील मानस प्रथमेश सावंत या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता होती. सर्वसामान्य परिस्थितीतील त्या कुटुंबाला वर्षभरापूर्वी मालवण येथील सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या ‘१०० इडियट ग्रुप’ने लाखमोलाचा मदतीचा हात दिला. आणखीही दानशूर व्यक्तींच्या मदतीतून मुलाची शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीपणे पार पडले. याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी व येथील देवतांसमोर नतमस्तक होण्यासाठी सावंत कुटुंबीय मुलासह रविवारी मालवणात दाखल झाले. यावेळी त्यांनी १०० इडियट ग्रुप अॅडमिन व सदस्यांचे आभार मानले.
त्या मुलाच्या एका शस्त्रक्रियेसाठी काही लाख रुपये रक्कम आवश्यक होती. याबाबत माहिती मिळताच नेहमीच मदतकार्यात पुढाकार घेणाऱ्या १०० इडियट ग्रुप सदस्य यांनी एकत्रित केलेली रक्कम मार्च २०२२ ला डॉ. शिल्पा झांटये, डॉ. मालविका झांटये, नेहा कोळंबकर, माधुरी मेस्त्री व ग्रुप सदस्य यांच्या उपस्थितीत त्या मुलांच्या पालकांच्या स्वाधीन केली. दरम्यानच्या काळात शस्त्रक्रिया व उपचारानंतर मुलगा ठीक झाला. याबाबत आभार मानन्यासाठी मुलासह पालक मालवण येथे आले. पिंपळपार येथे देवता चरणी नारळ ठेऊन तसेच १०० इडियट ग्रुपचेही आभार मानण्यात आले.