आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बिळवस येथे रस्त्याच्या कामांचा शुभारंभ
मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या विविध रस्त्याच्या कामांचा शुभारंभ रविवारी आ. नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग योजनेत बिळवस प्र.जी.मा.३२ ते सातेरी मंदिर मार्ग मजबुतीकरण डांबरीकरण करणे (१० लक्ष), सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२०२३ अंतर्गत बिळवस धाकु धाम ते सातेरी जलमंदिर मार्ग ग्रा. मा.२६९ (१० लक्ष) आणि बिळवस प्र.जी.मा. ३२ ते सातेरी मंदिर मार्ग खडीकरण व डांबरीकरण करणे (५ लक्ष) ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. बिळवस ग्राम सेवा मंडळचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यपक सूर्यकांत पालव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालूकाप्रमुख छोटू ठाकूर, उपसरपंच मसुरे पिंट्या गावकर, वासू चव्हाण, अशोक बागवे, अमित भोगले, सुहास पेडणेकर, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, उपशाखा प्रमुख रमेश फणसे, अध्यक्ष मुंबई मंडळ सूर्यकांत पालव, चिटणीस अशोक पालव, माजी नायब तहसीलदार जयराम पालव, माजी पोलिस पाटील विकास सावंत, माजी अध्यक्ष सातेरी देवालय ट्रस्ट आनंद पालव, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश फणसे, शिवसैनिक मोहन पालव, संकेत पालव, प्रशांत फणसे, विलास शृंगारे, सुजित पालव, आदित्य सावंत, रोहित सावंत, तुषार पालव, भाई माधव, अशोक पालव, अथर्व पालव, रमेश पालव, रुपेश सावंत, सर्वेश सावंत, आनंद साळुंके, अनिल सावंत ,गोपाळ पालव, शुभम वारंग, सुबोध फणसे आदी उपस्थित होते.